आय. क्यू. टेस्टचा शोध आल्फ्रेड बिनेट या मानसशास्त्राच्या अभ्यासकाने बुद्धयांक चाचणी म्हणजे आय. क्यू. टेस्टचा शोध लावला. इतरांपेक्षा तुलनेने कमी हुशार मुलांकडे अधिक लक्ष पुरविणयाची गरज आहे, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर ही मुले कशी ओळखायची हे शोधून काढण्यासाठी त्याने थिओडोर सायमन या त्याच्या सहकार्याच्या मदतीने ऐक चाचणी पद्धत तयार केली. अनुभवांच्या आधारे शिकण्याची, अडचणींवर मात करण्याची आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची व्यक्तीची क्षमता जोखण्यासाठी ही आय.क्यू.टेस्ट केली जाते.
काय आहे आय. क्यू? इंटेलिजंस कोशंट (आय.क्यू) हा व्यक्ती मधील बौद्धिक पातळी (Level of Intelligence) मापतो, गोष्टी लक्षात ठेवण्याची आणि आठवण्याची बौद्धिक क्षमता तो दर्शवतो.
आय.क्यू. कसा मोजतात? आय. क्यू मोजण्यासाठी जुना व नवीन असे दोन प्रवाह आहेत. जुन्या प्रवाहानुसार आय.क्यू. हा माणसाच्या मेंदूचे बौद्धिक वय (मेंटल एज) आणि जन्मापासूनचे वय (क्रोनॉलॉजिकल एज) या आधारे मोजला जातो. त्यासाठी एक सूत्र आहे.
आय.क्यू (बौद्धिक वय-जन्मापासून वय) मानवी मेंदूचे बौद्धिक वय मोजण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्या शास्त्रीयदृष्ट्या प्रचलित पद्धतीनुसारच केल्या जातात. मानसशास्त्रात अशा सुमारे 600 प्रकारच्या चाचण्या सांगितलेल्या आहेत. माणसाचा सरासरी आय.क्यू. हा कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 130 इतका असतो. 70पेक्षा कमी आय.क्यू. असणार्या व्यक्ती मतिमंद गटाट मोडतात तर 130 पेक्षा जास्त आय.क्यू. असलेल्या व्यक्ती असामान्य किंवा जिनियस वर्गवारीत मोडतात.