शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या देशात चिमुकल्यादेखील फॅशनला बळी, 4 वर्षाच्या मुलींसाठी स्पेशल ब्युटी पार्लर्स

मुलींना फॅशनची आवड असते हे तर संपूर्ण दुनियेला माहीत आहे पण एक देश असा देखील आहे जिथे सुंदर दिसणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. येथील मुली सुंदर दिसण्यासाठी तासोतास मेकअप करतात आणि गरज भासल्यास प्लास्टिक सर्जरी करायला देखील मागे पुढे विचार करत नाही. म्हणूनच येथे ब्युटी प्रॉडक्ट्सची डिमांड आहे आणि फॅशन इंडस्ट्री यश गाठतीय. उल्लेखनीय आहे की दुनियेत सर्वात अधिक कॉस्मेटिक सर्जरी दक्षिण कोरियात होत असून सर्वात मोठा सौंदर्य प्रसाधन बाजार देखील या देशात असल्याचे मानले जाते.  मागील वर्षी या इंडस्ट्रीद्वारे कमाईचा आकडा 13 बिलियन डॉलर असा आहे.
 
होय आम्ही सांगत आहोत दक्षिण कोरिया या देशाबद्दल. येथे आता कॉस्मेटिक कंपन्या लहान मुलींना टार्गेट करत आहेत. येथे चार ते दहा वर्षाच्या मुलींसाठी ब्युटी प्रॉडक्ट्स, पार्लर आणि स्पा सुविधा उपलब्ध आहे. यामुळे लहान चिमुकल्या देखील याकडे आकर्षित होत आहे. येथे शाळेत जाण्यापूर्वी मुलींसाठी बॅग आणि वह्यांपेक्षा मेकअप करणे अधिक महत्त्वाचे आहे.
 
तसेच कॉस्मेटिक कंपन्यांचा दावा आहे की लहान मुलांसाठी हेल्दी कॉस्मेटिक उपलब्ध केले जाते. यात पाण्यात विरघळणारे नेल पॉलिश, फँसी साबण, शेळीच्या दुधाने तयार शैम्पू आणि नॉन-टॉक्सिक लिप कलर सामील आहेत. तरी यावर मी लहान नाही असे लिहिलेले आहेत. येथे लहान मुलींसाठी उघडण्यात आलेल्या स्पा सेंटरमध्ये फुट मसाज, मेनीक्योर आणि मेकअप सारख्या सुविधा आहेत. यासाठी 2500 रुपयांपर्यंत चार्ज केलं जातं. 
 
सुंदर दिसण्याच्या नादात या मुली व्हिडिओ बघून ट्रिक फॉलो आणि शेअर देखील करतात. दुसरीकडे दक्षिण कोरियात या ट्रेंडचा विरोध देखील होत आहे. यात काही स्त्रिया अनिवार्य मेकअपच्या परंपरेला आव्हान देत आहेत. त्या या परंपरा मोडू इच्छित आहेत.