नेताजी सुभाषचंद्र बोस ...!!
'आमच्या देशावर राज्य करून आमच्याच माणसांना हीनतेची वागणूक मिळावी, हे तर भारत द्वेष्टेच' असा आवाज उठविणारे नेते म्हणजेच 'नेताजी सुभाषचंद्र बोस'! बर्लिन व हेम्बुर्ग या दरम्यान एका जहाजावर 29 मे 1941 रोजी जर्मनीचे सर्वेसर्वा हिटलर व त्यांची भेट झाली. पहिल्याच भेटीत हिटलरने त्यांना 'भारताचे' फ्युअरर (भारताचे नेताजी) हिज एक्सलन्सी सुभाष बोस' हे वाक्य वापरून स्वागत केले. तेव्हापासून लोक त्यांना 'नेताजी' या नावाने ओळखू लागले.
ओरिसा प्रांतातील जगन्नाथपुरी जवळील 'कटक' येथे 23 जानेवारी 1897 रोजी जानकीनाथ व प्रभावतीदेवी यांच्या उदरी 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांचा जन्म झाला. त्यांना सात बंधू व सहा बहिणी होत्या. त्यांच्या लहानपणी अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल घृणा निर्माण झाली. ते वयाच्या 5व्या वर्षी 'प्रोटेस्टंट युरोपी स्कूल'मध्ये जाऊ लागले. तेथील इंग्रजी विद्यार्थी भारतीय विद्यार्थ्यांना शिव्या देत व त्यांच्याबोरब खेळत नसत. ते आपल्या मामासोबत जेव्हा कोलकातला गेले तेव्हा अवघ्या पंधरा वर्षांच्या 'सुशीलकुमार सेन' यांनी 'वंदेमातरम' हे राष्ट्रगीत म्हटल्यामुळे त्याला 15 फटक्यांची शिक्षा झाली. ती त्यांनी पाहिली. आपल्या देशात राहून आपल्याला राष्ट्रगीत म्हणणचा अधिकार नसावा. हे पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटले. कोलकात्यात महाविद्यालयात असताना इंग्रजीचे प्राध्यापक 'ओएटन' (ओटन) हे भारतीय विद्यार्ध्याला द्वेष करत. त्यांना एका विद्यार्थ्याला मारले. नेताजींनी विद्यार्थ्यांना संघटित करून ओटनला (10 जाने.1916) मारले. त्यामुळे त्यांना महाविद्यालयातून काढून टाकले. म्हणून त्यांना बी.ए.ची परीक्षा देता आली नाही. ते कटकला आले. त्यांनी अनेक क्रांतिकारकांच्या चित्रांचा संग्रह केला परंतु ती वही घरच्या लोकांनी जाळून टाकली. हे सर्व इंग्रजांमुळे घडत आहे असा त्यांना अनुभव होता म्हणून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रजांविरुद्ध लढले.
नदीकिनारी बसून सूर्यास्त पाहण्याचा आनंद लुटणारे व स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेले धार्मिक वृत्तीचे नेताजी शाळेच्या दरम्यान ते सद्गुरु शोधासाठी हरिद्वार, हृषीकेश, अयोध्या इ. ठिकाणी जाऊन आले. परंतु त्यांना योग्य सद्गुरु भेटले नाहीत. बी.ए. झाल्यावर ते इंग्लंडला गेले व सात महिन्यात चौदा विषयांचा अभ्यास करून सप्टेंबर 1920 मध्ये आ.सी.एस.च्या कठीण परीक्षेत चौथ्या क्रमांकाने पास झाले. त्यांनी केंब्रिज विश्वविद्यालयाची बी.ए. ही पदवी प्राप्त करून घेतली. इंग्रजांची नोकरी करायचीच नाही म्हणून त्यांनी नोकरी केली नाही. 'देशबंधू चित्तरंजन दास' या बंगाली नेत्यांबरोबरही त्यांनी समाजकार्य केले. दासबंधूंच्या सहवासामुळे त्यांना अटक झाली आणि त्यांनी स्थापन केलेल्या 'राष्ट्रीय स्वंसेवक दला'वर बंदीही घातली गेली. मंडालेच्या तुरूंगात चित्तरंजन दासांचा मृत्यू झाला. नेताजींना मंडालेला असताना क्षयरोगही झाला होता. 26 जानेवारी 1930 रोजी नेताजींनी कोलकात्यास स्वातंत्र्यदिन साजरा केला व त्याच दिवशी त्यांची कोलकोत्याचे महापौर म्हणून निवड झाली. नेताजी लंडनला असताना त्यांची 'हरीपुरा' येथे फेबु्रवारी 1938 मध्ये भरणार काँग्रेसच्या 51 व्या अधिवेशनाचे अध्क्षय म्हणून निवड झाली. या अधिवेशनाला ते आल्यावर त्यांची 51 बैलगाड्यांच्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
इंग्रजांनी त्यांच्यावर अनेक वेळा अनेक गुन्हे नोंदवून अनेक प्रकारे त्रास दिला. परंतु ते मोठ्या धीराने सामना करत राहिले. हिटलरने त्यांना एक विमान भेट देऊन सर्वतोपरी साहाय्य देण्याचे वचन दिले होते. 'आझाद हिंद सेना' या सेनेचे नेतृत्व नेताजींकडे होते. ही संस्था जर्मनीत होती. या संस्थेतील सैनिक नेताजींच्या मताला सहमत होऊन हिंदी पलटण तयार झाली. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा।' असा नेताजींनी नारा दिला. 'आझाद हिंद' ही संस्था अनेक देशात स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून देशाला बळ मिळत गेले. स्त्रियांचीही पलटण निर्माण केली. असा हे नेतृत्ववान नेता म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. शिस्त म्हणजे काय हे सांगणारा आणि त्याचा शिरस्ता घालून देणारा नेता म्हणजेच सुभाषचंद्र बोस. भारत देशाला मिळालेला हा फुलोरा पुन्हा मिळणे नाही. भारत देशातल्या पाचव्या व ऋतूचा गंध सार्या जगात दरवळला.
विठ्ठल जोशी