पाऊल दाखवून कमावते लाखो रूपये
टोरांटो- या जगात जो पैसा कमावत नाही त्याला मूर्खच म्हणावा लागेल इतके पैसे कमवण्याचे मार्ग निर्माण झाले आहेत. सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेत तर अनेक लोक अनेक मार्गाने पैसे मिळवत आहेत. कॅनडाची एक 32 वर्षांची मॉडेल तर आपल्या पावलांचे प्रदर्शन करुन पैसे कमवाण्याचा भन्नाट मार्ग तिने शोधला आहे. त्यामुळे ती सध्याच इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलेली आहे.
जेसिका आपल्या या पावलांची छायाचित्रे सोशल मीडियात शेअर करुन दर तासाला हजारो पौंड कमावते. पावलांचा सौंदर्याचे लक्षण म्हणून वापर करुन कुणी पैसे कमावत असेल असे एरवी आपल्याला वाटलेही नसते. मात्र, या जगात आश्चर्यांची मूळीच कमतरता नाही.