सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

दुनियेतील शेवटल्या पांढऱ्या गेंड्याच्या मृत्यूची कहाणी

दुनियेत काही पशूंची प्रजाती लुप्त होत आहे. यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मनुष्याच्या स्वार्थ आणि लोभामुळे काही प्रजाती लुप्त झाल्या आहेत. आपल्या हे जाणून आश्चर्य वाटेल की गेंड्यासारखी प्रसिद्ध प्रजाती लवकरच पृथ्वीवरून अलविदा म्हणणार. याची सुरुवातदेखील झाली आहे.
 
दुनियेच्या शेवटल्या पांढर्‍या गेंड्याची मृत्यू झाल्याची बातमी आहे. आता तो काळ अधिक दूर नाही जेव्हा डायनासोरप्रमाणे गेंड्यांचे किस्से सांगितले जातील. अनुसंधानकर्त्यांप्रमाणे दुनियेतील शेवटला पांढरा नर गेंडा सूडान याची वयासंबंधी समस्यांमुळे मृत्यू झाली. केनियाच्या ओआय पेजेटा अभ्यारण्याहून जाहीर एक वक्तव्याप्रमाणे 45 वयाच्या गेंड्याची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला मृत्यूचे औषध देण्यात आले. सूडानचे स्नायू आणि हाडं कमजोर झाले होते. त्याच्या त्वचेवर अनेक जखमा होत्या. खराब तब्येतीत सूडान फेब्रुवारीचे शेवटले दोन आठवडे पडलेलाच होता.
 
हे नर गेंडा दोन जिवंत मादा गेंड्यांच्या मदतीने लुप्त होत असलेल्या या प्रजातीला वाचवण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न होता. 1960 मध्य आफ्रिकाच्या जंगलात या गेंड्यांची संख्या सुमारे 2000 होती. एकेकाळी सूडान खूप प्रसिद्ध होता. हजारो लोकं त्याला बघायला येत असे. तो आपल्या प्रजातीच्या शेवटला नर गेंडा असल्यामुळे मागील काही वर्षांपासून चर्चेत होता.
गेंड्याच्या शिंगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सूडान आपल्याच दुनियेतून लुप्त झाला. सूडानचे केनिया येथील ओल पेजेटा कंजरवेंसी येथे देखभाल केली जात असे. त्याच्या सुरक्षेसाठी गनमॅन उभे असायचे. सूडान गेल्यानंतर आता नॉर्दन पांढर्‍या गेंड्यांच्या नावाखाली दोन मादा गेंडा वाचल्या आहेत ज्यांना शिकारींपासून वाचवण्यासाठी पूर्णपणे देखरेखीत आहेत.
 
जर आताच या प्रकारच्या प्रजातींच्या संरक्षणाचे प्रयत्न केले गेले नाही तर येणार्‍या काळात पृथ्वीवर केवळ मनुष्यांचे झुंड दिसतील.