सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (16:16 IST)

आरोग्य विभागात 7343 पदांची भरती सुरु

महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागातर्फे (MPH)जाहीर करण्यात आलेल्या भरती नोटिफिकेशननुसार (Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीची (MPH Recruitment 2021) अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाची लिंक काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
 
या भरती अंतर्गत ३ जाहिराती प्रकाशित झाल्या आहे. ग्रुप ड जाहिरात ३४६६ पदांसाठी, ग्रुप क जाहिरात २७२५ पदांसाठी आणि ग्रुप अ जाहिरात ११५२ पदांसाठी. एकूण 7343 पदांची हि मेगाभरती सध्या सुरु आहे. 
 
आरोग्य विभाग ग्रुप ड जाहिरात – ३४६६ जागा 
सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-ड पदाच्या एकूण 3466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021आहे. 
 
पदाचे नाव – गट-ड
पद संख्या – 3466
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/
 
 
आरोग्य विभाग ग्रुप अ जाहिरात – ११५२ जागा 
सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 1152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2021आहे.
 
पदाचे नाव – गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 1152 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS
फीस –
खुला प्रवर्ग – रु. 1500/-
राखीव प्रवर्ग – रु. 1000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
 
 
आरोग्य विभाग ग्रुप क जाहिरात – २७२५ जागा 
सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-क पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021आहे. 
 
पदाचे नाव – गट-क
पद संख्या – 2725
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in