शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:13 IST)

भारतीय नौदलात रिक्त जागा, 12 वी उर्त्तीण करु शकतात अर्ज

भारतीय नौदलाने 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत चार वर्षांच्या B.Tech कोर्ससाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज प्रक्रियेत निवडलेले उमेदवार भारतीय नौदल अकादमी, एझीमाला, केरळ येथे जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या तुकडीचा भाग असतील. हे नमूद करण्यासारखे आहे की केवळ अविवाहित पुरुष या नेव्ही कोर्ससाठी अर्ज करू शकतात.
 
भारतीय नौदलाने शिक्षण शाखा आणि कार्यकारी आणि तांत्रिक शाखेत 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. नेव्हीने शिक्षण शाखेअंतर्गत एकूण 5 आणि कार्यकारी आणि तांत्रिक शाखेअंतर्गत 30 रिक्त पदे जाहीर केली आहेत म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी दोन्ही शाखांमधून एकूण 35 अर्जदारांची निवड केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आहे. अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
 
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख - 01 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2021
 
भारतीय नौदल 10+2 पदांचा तपशील
शिक्षण शाखा - 5 पदे
कार्यकारी आणि तांत्रिक - 30 पदे
 
वय श्रेणी
अर्जदार 2 जुलै 2002 नंतर आणि 1 जानेवारी 2005 पूर्वी जन्मलेला असावा.
 
शैक्षणिक पात्रता
इंग्रजीमध्ये 50% गुणांसह 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित मध्ये 70% गुण.
 
अर्ज कसा करावा
उमेदवारांना www.joinindiannavy.gov.in या भरती वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर अर्जदार त्यांचे ऑनलाइन अर्ज भरू शकतील. वेळ वाचवण्यासाठी, अर्जदार त्यांचे वापरकर्ता प्रोफाइल आगाऊ भरून त्यांची कागदपत्रे अपलोड करू शकतात.