शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (12:31 IST)

MAHA DES Bharti 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 पदांची भरती

jobs
MAHA DES Bharti 2023 : अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी 260 सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक पदासाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेत स्थळांवर https://mahades.maharashtra.gov.in/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवावे. 
 
पदांचा तपशील
सहाय्यक संशोधन अधिकारी – एकूण 39 पदे 
सांख्यिकी सहाय्यक – एकूण 94 पदे 
अन्वेषक – एकूण 127 पदे 
एकूण -260 पदे 
 
पात्रता- 
सहाय्यक संशोधन अधिकारी – सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / अर्थमिति / अर्थशास्त्र गणित / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी असावी .
सांख्यिकी सहाय्यक – सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / इकॉनोमॅट्रिकस / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / इकॉनोमॅट्रिकस / वाणिज्य मध्ये किमान 45% गुणांसह पदवीधर असावा.
अन्वेषक – मॅट्रिक / किमान 10वी इयत्ता उत्तीर्ण असावे.
 
वयोमर्यादा- 
उमेदवारांचे कमाल वय 40 वर्ष असावे.
राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वय वर्ष 45 आहे. 
 
अर्ज शुल्क -
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी-1000 रुपये 
आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी -900 रुपये 
 
वेतनमान -
सहाय्यक संशोधन अधिकारी – रु. 38,600 ते 122800/-
सांख्यिकी सहाय्यक – रु 29200 ते 92300/-
अन्वेषक – रु 25500 ते 81100/-
 
महत्त्वाच्या तारखा- 
अर्ज आरंभ तिथी- 15 जुलै 2023
अर्ज करण्याची अंतिम तिथी- 05 ऑगस्ट 2023
नौकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र   



Edited by - Priya Dixit