मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (12:17 IST)

MAHAGENCO Recruitment 2022 : महाराष्ट्र विद्युत विभागात 661 पदांवर भरती

jobs
MAHAGENCO Bharti 2022: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पदांशी संबंधित माहिती मिळवावी लागेल.एकूण 661 पदांची भरती केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार mahagenco.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
 
अर्ज कसा कराल -
या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. अर्ज 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाला आहे.
 
पदांचा तपशील- 
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मधील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 
 
एकूण पदे - 661 
AE पदे - 322 
JE पदे - 339
 
अर्जाची फी - महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये सहाय्यक अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. यासोबतच कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी 800 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
 
महत्त्वाच्या तारखा - 
या पदांसाठी 18 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
 
अर्जाची पात्रता - या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रताही वेगळी आहे.
 
Edited By- Priya Dixit