सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (05:26 IST)

समृद्धी मिळविण्यासाठी झाडूच्या या 5 खास गोष्टी जाणून घ्या

Broomstick
ज्योतिष-वास्तू आणि पौराणिक माहितीनुसार झाड़ू केवळ घर स्वच्छ ठेवण्यातच मदत करत नाही तर आमच्या जीवनात येणारे दारिद्र्य बाहेर काढते. झाडूमुळे घरात सुख-समुद्धी येते. पण जिथे झाडूचा अपमान होता तिथे धनाची हानी होते, कारण झाडूत लक्ष्मीचा वास असल्याचे मानले आहे.
 
पाहू या झाडूमुळे सुख-समृद्धी आणि धन प्राप्त करण्याचे मार्ग:
 
* झाडू कधीही घराबाहेर किंवा गच्ची ठेवू नये. असे केल्याने घरात चोरीची घटना होण्याची भीती असते.
 
* झाडू लपवून अर्थात अशा ठिकाणी ठेवायला हवी जिथून ‍ती घरातील सदस्यांना किंवा बाहेरच्यांना दिसली न पाहिजे.
 
* गायला कधीही झाडूने मारू नये.
 
* झाडूला चुकूनही लाथ लावणे योग्य नाही. त्यात देवीचा वास असल्याचे मानले आहे त्यामुळे झाडूला पाय लागणे अशुभ ठरेल.
 
* घरातील सदस्य यात्रेवर किंवा काही खास कामासाठी बाहेर पडल्यावर लगेच झाडू लावू नये. अशाने जाणार्‍याचा हाती यश लागत नाही.