शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (14:02 IST)

अत्यंत दुर्लभ योग घडून येत आहे, 16 जूनला जेव्हा सूर्य करेल राशी परिवर्तन, काय प्रभाव पडेल 12 राशींवर

ज्योतिष्यात ग्रहांचे राशी परिवर्तन करणे ही ऐक सामान्य घटना आहे पण कधी कधी या ग्रहांचे गोचर बर्‍याच दुर्लभ संयोगांचे सृजन करून देतात, जे बर्‍याच वर्षांनंतर निर्मित होतात.16 जून, रविवारी नवग्रहांचा राजा सूर्य आपली राशी परिवर्तन करून आपली मित्रराशी मिथुनामध्ये प्रवेश करत आहे. सूर्याच्या या गोचरामुळे 16 जून 2019 बरेच दुर्लभ शुभाशुभ योगांचा निर्माण होणार आहे. असा दुर्लभ संयोग बर्‍याच वर्षांनंतर बनतो.
 
तर जाणून घेऊ की 16 जून 2019 ला कोण कोणत्या प्रमुख शुभाशुभ योगांचा निर्माण होणार आहे?
 
1. बुधादित्य योग- 16 जून 2019 रोजी सूर्याच्या मिथुन राशीत प्रवेशासोबतच मिथुन राशीत 'बुधादित्य योग'चा निर्माण होईल. 'बुधादित्य योग' एक राजयोग आहे, जो जातकाला त्याच्या जीवनात भरपूर लाभ आणि समृद्धी प्रदान करतो. सामान्यतः: कोणता ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ असतो तर सूर्याच्या प्रकाशामुळे तो आपला प्रभाव गमावून देतो. पण एकमात्र बुध असा ग्रह आहे, जो सूर्याच्या जवळ असून देखील अस्त होत नाही आणि आपला शुभ प्रभाव कायम ठेवतो. बुधाच्या या विशेषतेमुळे सूर्य व बुधाच्या युतीला 'बुधादित्य' नावाच्या राजयोग म्हणून ओळखला जातो.
 
2. गजकेसरी योग- 16 जून 2016ला चंद्र वृश्चिक राशीत राहील. चंद्र कुठल्याही राशीत फक्त सव्वा दोन दिवस स्थित राहतो. नवग्रहांमध्ये चंद्र एक असा ग्रह आहे जो सर्वात कमी दिवस कुठल्याही राशीत राहतो. गुरु आधीपासूनच वक्र होऊन वृश्चिक राशीत विराजमान आहे. चंद्राच्या या उपस्थितीमुळे वृश्चिक राशीत 16 जूनला  'गजकेसरी' नावाचा राजयोग बनत आहे. जो जातकाला जीवनात आशातीत यश आणि उन्नती प्रदान करतो.  
 
3. ग्रहण योग- 16 जून 2019ला सूर्याचे मिथुन राशीत प्रवेशासोबतच मिथुन राशीत 'ग्रहण योग'चा देखील निर्माण होणार आहे. मिथुन राशीत राहू पूर्वेत स्थित आहे. सूर्याच्या गोचरामधून मिथुन राशीत सूर्य-राहूच्या युतीचे निर्माण होईल ज्याला 'ग्रहण योग'च्या नावाने ओळखले जाते. 'ग्रहण योग' एक अशुभ योग आहे जे जातकाला जीवनात अपयश आणि संघर्ष देतो.
 
4. अंगारक योग- 16 जून 2019ला सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीत चतुर्ग्रही योगाचा निर्माण होईल ज्यात राहू-मंगळाची युती 'अंगारक' योगकारक आहे. 'अंगारक योग' एक अत्यंत अशुभ व अनिष्टकारी योग आहे ज्यामुळे जातकाला आपल्या जीवनात संकट आणि अपयशाचा सामना करावा लागतो.
 
कोणत्या राशीवर पडेल सर्वाधिक प्रभाव?
 
16 जून 2019 ला बर्‍याच वर्षांनंतर बनत असलेले या दुर्लभ संयोगांमुळे सर्व 12 राशीचे जातक प्रभावित होतील पण सर्वाधिक प्रभावित मिथुन राशीचे लोक होणार आहे, कारण यात जास्त योग मिथुन राशीत बनत आहे.  
 
तर जाणून घेऊ कोणत्या राशीच्या जातकांसाठी हे दुर्लभ संयोग लाभदायक आहे व कोणत्या राशीच्या जातकांसाठी हे संयोग हानिकारक आहे ?
 
शुभ प्रभाव असणार्‍या रास - वृषभ, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, मीन.  
 
अशुभ प्रभाव पडणार्‍या रास - मेष, मिथुन, सिंह, धनू, कुंभ.