रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (17:05 IST)

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या आणि हृदय निरोगी ठेवा

* रोज सकाळ- संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
 
* तांब्यात अँटी ऑक्सीडेंट्स आढळतात, ज्याने वय कमी दिसतं आणि हे पाणी कर्करोगावर मात करण्यातही मदत करतं.
 
* रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी पिण्याने त्वचेसंबंधी समस्या दूर होते आणि त्वचा उजळ दिसते.
 
* तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने यात आढळणारे कॉपर रक्ताची कमी दूर करतं. याने अशक्तपणा दूर होतो.
 
* तांब्यात अँटी बॅक्टीरियल तत्त्व असतात, ज्याने जखम लवकर भरते. जखम झाली असल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
 
* तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेलं पाणी पिण्याने कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित राहतं आणि हृदय निरोगी राहतं.
 
* अँटी बॅक्टीरियल असल्यामुळे हे पाणी पिण्याने लूज मोशन, कावीळ आणि अतिसाराचा धोका टळतो.
 
* रोज सकाळ- संध्याकाळ तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याने सांधेदुखीत आराम मिळतो.
 
*  तांब्यात आढळणार्‍या कॉपरने थायरॉक्सिन हॉर्मोन संतुलित राहतं आणि थायरॉईडचा धोका टळतो.
 
* कमीत कमी 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याने अॅसिडिटी आणि गॅस दूर होते. पचन क्रिया सुरळीत होते.