बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (14:57 IST)

कोरोना काळात लग्न समारंभात सामील होत असाल तर नक्की वाचा

वेळ कोणासाठी देखील थांबत नसतं मग समोर व्हायरसच का नसो. कालांतराने कोरोनाच्या कालावधीत विविध कार्यक्रम देखील सुरू झाले आहे. लग्न हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण विधींपैकी एक आहे, प्रत्येक कुटुंब त्याचे आयोजन व्यवस्थितरीत्या करतं. परंतु सध्याच्या या कोरोनाच्या काळात काही दिवसांत लग्नाची प्रक्रिया खूप बदलली आहे. पाहुण्याची संख्या, वेळ सर्व कमी करण्यात आले आहे. सध्याच्या काळात लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे जोडीदार, सप्तपदी आणि काही जवळची माणसं. 
 
देव उठणी एकादशी म्हणजे तुळशीच्या लग्नानंतर आपल्या कडे देखील लग्न समारंभाचे काही आमंत्रण येणाची शक्यता असू शकते. अशा वेळी त्या लग्नाच्या आमंत्रणाचा आनंदाने स्वीकार करावा. पण लक्षात ठेवा की कोरोना अजून गेलेला नाही तो आपल्या सभोवतालीच आहे, म्हणूनच काही सावधगिरी बाळगून लग्नात सामील व्हा.
 
* सर्व सदस्य सामील होऊ नये - 
सामान्य दिवसांत तर कोणत्याही लग्नात कुटुंबातील सदस्य सामील होतं असे पण या काळात प्रयत्न करा की कुटुंबातील एक किंवा दोनच सदस्यांचा समावेश करा. वडीलधारी, लहान मुले आणि गरोदर बायकांनी या वैवाहिक समारंभात अजिबात सामील होऊ नये. लग्नाच्या घरात वेगवेगळ्या ठिकाण्यांहून लोक येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
* कोणत्याही वस्तूंना स्पर्श करू नये - 
ही अतिशय सामान्य सवय आहे आणि लग्नसमारंभात बहुतेक लोकांमध्ये आढळून येते. की जेव्हा दोन लोक किंवा गट आपसात संभाषण करत असतात तर कोणाचे हात खुर्चीवर ठेवलेले असतात, तर कोणी भिंतीला तर कोणी रेलिंगला धरून उभे राहतात. या सवयींमुळे कोरोनाचे संसर्ग पसरू शकतात म्हणून हे लक्षात ठेवा की कोणत्याही वस्तूंना स्पर्श करता कामा नये.
 
* 6 फुटाचे अंतर राखणं खूप महत्त्वाचे आहे - 
लग्नाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या सर्व विधी गटातच असतात. म्हणून हे महत्त्वाचे आहे की आपण स्वतःच दुसऱ्या पासून कमीत कमी 6 फुटाचे अंतर ठेवणं फार महत्त्वाचे आहे. मग या साठी आपल्या पासून कोणीही नाराज झाले तरीही चालेल. कारण आपल्याला कोरोना झाल्यावर आपल्यावर नाराज होणारी व्यक्ती इच्छा असून देखील आपली काही ही मदत करू शकणार नाही. जेव्हा लोकांना हे समजेल की आपण स्वतःच सामाजिक अंतर राखण्यास जागरूक आहात, तर ते स्वतःच आपल्या जवळ येणार नाही.
 
* अतिरिक्त मास्क आणि सॅनेटाईझर जवळ बाळगा- 
लग्नघर म्हटले तर वस्तू गहाळ होणारच. म्हणून हे आवश्यक आहे की आपण आपल्या सह किमान दोन ते तीन अतिरिक्त मास्क जवळ ठेवावे. जेणे करून जर आपण घातलेले मास्क जरी गहाळ झाले तर काळजी नसावी. त्याच सह आपण आपल्या हातात देखील सॅनेटाईझरची एक लहान बाटली ठेवा. जेणे करून आपणांस वारंवार आपले हात स्वच्छ करण्यात काहीही अडचण उद्भवू नये आणि स्वतःकडून देखील काही निष्काळजीपणा होऊ नये.