गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला दूर ठेवतो

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
 
संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत राहते.
 
मायग्रेन
जर डोके खूप दुखत असेल तर तुळस आणि एक चिमूटभर हळद दुधात प्यायल्यास आराम मिळतो. जर कोणाला काही दिवसांनी सतत डोकेदुखी होऊ लागली असेल तर त्याने दररोज सकाळी तुळशी आणि दूध प्यावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि लवकरच मायग्रेनसारखा आजार देखील दूर होईल.
 
रोगप्रतिकार शक्ती वाढते
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या दुधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीवायरल गुणधर्म आहेत, जे विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला बरे करण्यास उपयुक्त आहेत.

कर्करोगापासून बचाव  
तुळशीतही अनेक एंटीबायोटिक आणि एंटीऑक्‍सीडेंट गुणधर्म असतात आणि दुधामध्ये इतर सर्व पोषक घटक असतात, ज्यामुळे कर्करोग सारखा प्राणघातक आजार वाढत नाही.
 
ताण कमी होण्यास मदत 
तुळशीच्या पानांमध्ये उपचार करण्याचे गुणधर्म असतात. जर आपण तणाव, नैराश्यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज हे दूध प्या. डोकं शांत ठेवण्यासाठी याला गार करून पिणे फायदेशीर ठरेल. हे दूध मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करत.
 
वजन कमी करा करण्यास फायदेशीर 
जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता असेल तर तुळशीचे दूध पिण्यास सुरुवात करा. हे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे दूध श्वसनविषयक समस्या दूर करण्यात देखील उपयुक्त आहे.
 
याला तयार कसे करावे 
प्रथम दीड ग्लास दूध उकळा. दूध उकळण्यास सुरवात झाली की त्यात 8 ते 10 तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. दूध जेव्हा एक ग्लास उरेल तेव्हा गॅस बंद करा. हे दूध कोमट प्या.