सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (10:37 IST)

भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या

pumkin seeds
भोपळ्यासोबत त्याच्या बिया देखील फायदेशीर आहेत. याचे सेवन केल्याने मोठ्या आजारांपासून दूर राहता येते.
 
भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित करतात. मधुमेहाचे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने खाऊ शकतात.
 
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर असते, जे खाल्ल्याने भूक कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
 
भोपळ्याच्या बियांमध्ये क्युकरबिटासिन असते, जे केसांच्या वाढीस मदत करते.
 
यामध्ये फॅट, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे रक्ताभिसरण बरोबर होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.
 
यामध्ये असलेले सेरोटोनिन चांगले असते, ज्यामुळे नैसर्गिक झोप येते.
 
भोपळ्याच्या बियांचे तेल लावल्याने सांधेदुखीत आराम मिळतो.
 
डिमेंशिया आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती कमी होण्याच्या स्थितीत याच्या बिया फायदेशीर आहेत.
 
हे बियाणे त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
 
पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग रोखण्यासाठी तसेच शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी हे फायदेशीर मानले गेले आहे.

Edited by : Smita Joshi