रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (17:07 IST)

मेथीची भाजी खाण्याचे फायदे जाणून घ्या....

मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होतो. चला तर जाणून घेऊ मेथीची भाजी खाण्याचे फायदे.
 
मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
 
केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसाना लावा, कोंडा लवकर संपेल. 
 
मेथीच्या भाजीत गॅलॉक्टोमेनिन हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारा घटक असतो. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मेथीची भाजी फायदेशीर ठरते.
 
मेथीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक सुधारते, पचनक्रिया सुधारते.
 
मेथीच्या भाजीतील अँन्टिऑक्सिडंट ह्या गुणधर्मामुळे स्तनांच्या आणि आतड्यांच्या कर्करोगाला मेथी प्रतिबंध करते.
 
मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. मेथीची पाने चेहर्याचवरील सूज कमी करते.
 
तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते.