गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : शनिवार, 1 मे 2021 (09:34 IST)

Benefits of Alum : फिटकरीचे 7 आश्चर्यकारक फायदे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे

पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात. जाणून घ्या तुरटीचे फायदे-
 
तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने आराम वाटतो. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. याने शरीराला दुर्गध येत असल्याचा त्रास देखील दूर होतो.
 
शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या फिटकरीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते. 
 
शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली असेल तर त्यावर तुरटीचा उपयोग केल्याने जखम बरी होण्यास मदत होते. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी होते. एका ग्लास गरम पाण्यात एक चमचा तुरटी पावडर मिसळून पाणी कोमट झाल्यावर जखम धुवावी.‍ दिवसातून दोन ते तीन वेळा असे करु शकता.
 
दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी. याने तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो व तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या देखील नाहीशी होते.
 
शेव्हिंग नंतर लोशन वापरण्याऐवजी तुरटी प्रभावी असते. याने त्वचा मऊ होण्यास मदत होते. शेव्हिंगनंतर तुरटीचा खडा फिरवावा व दोन मिनिटाने थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्यावा.
 
पाय फाटण्याची समस्या असल्यास नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासावा. याने ही समस्या लवकरच बरी होईल.
 
केसांमधील ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवांचा त्रास नाहीसा होईल.