एक मोठे तळे होते. त्या तळ्यात तीन मासे त्यांच्या परिवारासमवेत रहात होते. तिघांचे स्वभाव वेगळे होते. त्यातील पहिला संकट आल्यास त्यावर आधीच उपाय करावा या मनोवृत्तीचा होता. जर संकट आलेच तर त्यातून सहिसलामत बाहेर कसे पडायचे ही युक्ती दुसऱ्याकडे होती. तर तिसरा सर्व निर्णय दैवाधीन ठेवणारा होता.
एकदा त्या तळ्याकाठी काही कोळी आले. त्यांच्या असे लक्षात आले की या तळ्यात खूप मासे आहेत. दुसर्या दिवशीच जाळे टाकून मासे पकडू असं ठरवून ते निघून जातात. त्यांचे बोलणे ऐकून पहिला मासा सावध होते आणि सर्व माशांना कोळ्यांचे बोलणे सांगतो, ''आपले इथं रहाणे आता धोक्याचे आहे. आज रात्रीच आपण दूर गेले पाहिजे. आपण बाजूच्या तळ्यात रहायला जाऊ.'' असे तो सुचवतो.
ND
ND
हा उपाय दुसऱ्या माशाला पसंत पडतो. तो आपल्या परिवाराला समजावून सांगतो की, ''मूळ घर सोडावं लागलं म्हणून दुःख करीत इथे बसलो तर संकटात सापडू. त्यापेक्षा जिथे सुरक्षित रहाता येईल तिथेच सुखाने राहू.''
तर तिसरा मासा सांगतो, ''मरण आणि संकट नशिबात असेल तर ते टळणार नाही. अगदी एका जागेहून दुसरीकडे गेलो तरी मरण येणार असेल तरी ते चुकणार नाही. दैव जर तुम्हाला साथ देत असेल तर कितीही संकटे आली तरी आपद्ग्रस्त जीव सुरक्षित रहातो. मी काही तुम्हा दोघांबरोबर दुसर्या तळ्यात येणार नाही.''
त्याला तेथेच ठेवून पहिला व दुसरा मासा परिवारासकट दुसर्या तळ्यात निघून जातात. दुसर्याच दिवशी ते कोळी जाळी टाकून तिसऱ्या माशाला आणि त्याच्या परिवाराला पकडतात.