बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (22:51 IST)

बोध कथा : लोभी राजा

एक राजा होता.तो खूप लोभी होता. त्याला सोनं जमा करायची खूप आवड होती.तो एका मोठ्या महालात राहत होता. त्यांच्या कडे खूप नोकर होते. त्याला एक सुंदर गोंडस मुलगी होती. तो सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलीवर करत होता. त्याचा घराच्या समोर एक सुंदर बाग होता. त्यात खूप सुंदर फुले उमलली होती. तो नेहमी विचार करायचा की माझ्याकडे खूप संपत्ती असावी आणि खूप सोनं असावं. एके दिवशी रात्री स्वप्नात देव येतात आणि त्याला काही वर मागण्यास सांगतात. त्यावर तो विचार करतो की मी काय वर मागू असं करत त्याला सुचतं की जर त्यांनी असं  मागितले की मी ज्या वस्तूंना स्पर्श करू ती सोन्याची बनावी तर माझ्या कडे खूप सोनं होईल आणि मी जगातील सर्वात श्रीमंत राजा होईन. असं विचार करत तो देवाला म्हणतो की मला असं वर द्या की मी ज्या गोष्टींना हात लावू  त्या सोन्याचा बनाव्यात. तू एकदा पुन्हा विचार कर जे मागत आहे ते योग्य आहे का? त्या राजाने त्याला होकार दिले आणि तेच वर द्या असं सांगितले. देव म्हणाले की उद्या सकाळी तू ज्या वस्तूंना स्पर्श करशील त्या सगळ्या सोन्याचा होतील. असं म्हणून देव गायब झाले. सकाळी उठल्यावर त्याने रात्री जे घडले तर खरे आहे का बघण्यासाठी पाण्याच्या ग्लास ला हात लावला तर तो खरंच सोन्याचा झाला. हे बघून त्याला विश्वास बसला की रात्री देव खरंच स्वप्नात येऊन आपल्याला वर देऊन गेले. आता देवाकडून मिळालेल्या वरदानामुळे तो ज्या वस्तूंना हात लावायचा त्या सोन्याच्या बनायचा. असं करत त्यांच्या कडे खूप वस्तू सोन्याचा झाल्या. तो बागेत गेला त्याने फुलांना स्पर्श केला तर ते देखील सोन्याचे झाले. असं करत त्याच्या महालातील सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या. त्याने  खाण्यासाठी ज्या पदार्थांना हात लावला ते देखील सोन्यात बदलल्या. आता मात्र त्याला आपल्या लोभी पणावर राग येत होता. तेवढ्यात त्याची मुलगी धावत धावत त्यांच्या कडे आली आणि त्याला बिलगून रडू लागली त्याने तिला स्पर्श करतातच ती देखील सोन्याची झाली. हे बघून त्याला रडू कोसळले आणि त्याने देवाला त्याचे वरदान परत घेण्याची विनवणी केली. देव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला महालाच्या जवळ वाहणाऱ्या नदीत स्नान करून ये असे सांगितले. तो लगेचच त्या नदीत स्नान करण्यासाठी गेला. त्याचा हातातील जादू त्या नदीच्या पाण्यात वाहून गेले.आणि तो जादू पासून मुक्त झाला. त्याचा हातातील जादू संपल्यावर सर्व वस्तू पूर्ववत झाल्या. आपल्या मुलीला परत हसत बागडतं बघून त्याच्या  डोळ्यातून आनंदाश्रू निघू लागले आणि त्याला ह्या गोष्टीमुळे धडा मिळाला की लोभ कधी ही करू नये. त्या नंतर तो आपल्या मुलीसह आनंदाने राहू लागला.