बोध कथा : कोल्हा आणि सारस

child poem
Kids Poem
Last Modified गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (17:17 IST)
एका जंगलात एक हुशार कोल्हा राहायचा. त्याला इतरांना फसवण्यात फार आनंद वाटायचा. त्या कोल्ह्याची मैत्री एका सारसशी होते. तो सारस फार भोळा होता. एके दिवशी कोल्ह्याने विचार केला की या सारसाशी थट्टा मस्करी करावी. हा विचार करून कोल्हा सारस कडे जाऊन म्हणाला - 'मित्रा उद्या माझ्याकडे जेवायला ये. 'धन्यवाद मित्रा आपण मला जेवण्याचे आमंत्रण दिले मी नक्की येईन.' सारस म्हणाला.
ठरलेल्या वेळी सारस कोल्ह्याकडे जेवायला जातो. जेवण्याची वेळ आल्यावर कोल्ह्याने ठरविल्या प्रमाणे सारस ला ताटलीत सूप पिण्यासाठी दिले. सूप ताटलीत पिणे हे काही समस्या नव्हती, पण सारस फक्त त्याच्या लांब चोचीचे टोकच त्या सुपात बुडवू शकला. त्याला सूप पीता येत नव्हते कारण कोल्ह्याने दिलेली ताटली पसरट होती आणि सारस ची चोच लांब होती. कोल्हा तर पटापट सूप पिऊन गेला आणि सारस बिचारा उपाशी राहिला.
सारसला फार लाजिरवाणे झाले. त्या कोल्ह्याने त्याचा अपमान केला आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याला समजले की कोल्ह्याने त्याची थट्टा मस्करी करण्यासाठीच त्याला जेवण्याचे आमंत्रण दिले होते.
इथे कोल्ह्याने त्याला विचारले की 'अरे मित्रा तू काहीच खात नाही तुला जेवण आवडले नाही का?
तर सारस म्हणाला- 'धन्यवाद मित्रा मला जेवण फार चविष्ट आहे' तू देखील माझ्याकडे जेवायला ये आणि जेवण्याचा आनंद घे' सारस ने विचार केला की ह्या लबाड कोल्ह्याला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे. ह्याने जो माझा अपमान केला आहे मी त्याची परतफेड त्याला देणारच.
दुसऱ्याच दिवशी कोल्हा सारसच्या घरी जेवायला जातो. तो आपल्यासह सारस ला देण्यासाठी काहीही भेट वस्तू आणत नाही.
'आता तर मी भरपूर जेवणार' असा विचार कोल्हा करीत होता.
सारस ने देखील जेवण्यासाठी सूप बनविले होते. सूपचा मस्त सुवास घरात दरवळत होता त्या कोल्ह्याची वासानेच भूक वाढली. त्याने बघितले तर काय सारस ने एका लांबोळ खोल अशा पात्रात सूप दिले होते. सारस ची चोंच लांब असल्यामुळे तो सहजपणे त्या पात्रातून सूप पीत होता. पण कोल्ह्याचे तोंड त्यामध्ये जातच नव्हते. बरेच प्रयत्न केल्यावर देखील कोल्हा सूप काही पिऊ शकला नाही आणि त्याला उपाशीच राहावे लागले. अशा प्रकारे सारस ने न बोलता आपल्या अपमानाची परतफेड केली आणि त्याची खोड मोडली.
तात्पर्य : जश्याच तसे


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट आवश्यक जाणून घ्या
कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात थैमान मांडले आहे. या परिस्थितीत संपूर्ण ...

उपयोगी सोपे किचन टिप्स

उपयोगी सोपे किचन टिप्स
* चापिंग बोर्डवरील डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घाला त्यावर एक लिंबू पिळा आणि ...

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये ...

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा
आपल्या शरीरावर कोणत्याही प्रतिक्रियेमुळे बर्‍याचदा खाज सुटणे सुरु होते. खाज वेगवेगळ्या ...

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.
भारतीय पाककृतीमध्ये लवंगाला एक विशेष स्थान आहे. त्याचा उपयोग केल्याने चवीसह त्याचे काही ...