शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (11:51 IST)

मूर्ख बगळा आणि मुंगूस

जंगलात एका मोठ्या वडाच्या झाडाच्या खोड्यांत बरेच बगळे राहत असे. त्याच झाडाच्या मुळाशी एका बिळात साप राहत होता. तो त्या बगळ्यांच्या पिलांना खाऊन टाकायचा. 
 
एकदा एक बगळा सापाने आपल्या पिलांना वारंवार खाऊन टाकत असल्यामुळे फार दुखी होता आणि रडत नदी काठी बसला होता. त्याला रडत असताना बघून पाण्यातून एक खेकडा बाहेर आला आणि म्हणाला 'मामा काय झाले आपण का रडत आहात?
 
बगळा म्हणे काय सांगू 'एक साप पुन्हा-पुन्हा माझ्या पिलांना खाऊन टाकतो. मला काहीच सुचत नाही की मी काय करावं? कसं त्या सापापासून माझ्या पिलांना वाचवायचं ? तूच काही उपाय सांग आता.
 
त्या खेकड्याने मनात विचार केला की हा बगळा तर माझा वैरी आहेच असे काही करावं की त्या सापा बरोबरच या बगळ्याचा देखील नायनाट झाला पाहिजे. असं विचार करत तो बगळ्याला म्हणाला की 'मामा तुम्ही एक काम करा मांसाचे काही तुकडे घेऊन त्या मुंगूसाच्या बिळा समोर नेऊन ठेवत ठेवत त्या सापाच्या बिळा समोर आणून ठेवा. त्या मांसाच्या तुकड्यांच्या वासामुळे मुंगूस बाहेर निघेल आणि तो सापाच्या बिळापर्यंत येऊन पोहोचेल तिथे त्याला सापाचा वास येईल आणि तो सापाला ठार मारेल. 
 
बगळ्याने असेच केले त्याच प्रमाणे तो मुंगूस मासाच्या तुकड्याचे वास घेत घेत सापाच्या बिळा जवळ येतो आणि सापाला तर ठार मारतोच त्याच प्रमाणे त्या वडाच्या झाडावरील बगळ्याला आणि त्याचा परिवाराला देखील खाऊन टाकतो. अश्या प्रकारे सापाचा आणि बगळाचा अंत होतो. 
 
बगळ्याने उपाय तर केला पण त्याचा परिणामाचा विचारच केला नाही. त्यामुळे त्याला आपले प्राण गमावले लागले. म्हणून काही करण्याचा पूर्वी त्याचा विचार नक्की करा.