शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (12:48 IST)

मला तर तुमच्या भावा सारखं बनायचं आहे

स्वत: मोठं होण्याचे प्रयत्न करा
एकदा एक माणसाने बघितले की एक गरीब गरीब मुलगा मोठ्या उत्सुकतेने त्याची महाग ऑडी गाडीला आतुरतेने बघत होता. गरीब मुलावर दया वाटली म्हणून तो श्रीमंत माणूस त्याला आपल्या गाडीमध्ये बसवून फिरायला घेऊन गेला.
 
मुलगा म्हणाला: साहेब, तुमची गाडी खूप चांगली आहे. ही तर खूप महागडी असेल?
श्रीमंत माणूस अभिमानाने म्हणाला: होय, लाखो रुपये किमतीची आहे.
गरीब मुलगा म्हणाला: हिला विकत घेण्यासाठी तर तुम्ही कठोर परिश्रम केले असतील?
श्रीमंत माणूस हसून म्हणाला: ही गाडी तर मला माझ्या भावाने भेट दिली आहे.
गरीब मुलगा काहीतरी विचार करून म्हणाला: वाह! तुमचा भाऊ किती चांगला आहे.
श्रीमंत माणूस म्हणाला: मला माहीत आहे की आता तू विचार करत असशील की तुला पण असा एक भाऊ असता ज्याने अशी महागडी गाडी भेट दिली असती तर मजाच आला असता. हो ना?
गरीब मुलाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, तो म्हणाला: नाही साहेब, मला तर तुमच्या भावा सारखं बनायचं आहे.
 
तात्पर्य: आपले विचार उच्च ठेवा. इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वत: मोठं होण्याचे प्रयत्न करा. मग तुम्हाला यश गाठता येईल.