रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (13:27 IST)

बालगणेश आणि चंद्र यांची कहाणी

balganesh
बालगणेश यांना बुद्धीचे देवता म्हणून संबोधले जायचे. बालगणेश हे अत्यंत नटखट तर होते पण मायाळू देखील होते. तसेच आजची ही गोष्ट चंद्राचे वेगवेगळे टप्पे कसे निर्माण झाले हे सांगते. तर एके दिवशी भोजनप्रेमी प्रसिद्ध असलेल्या श्रीबालगणेशाला एका भव्य मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले.
 
तसेच विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर बालगणेश यांचे पोट तुंडुंब भरले. नंतर बालगणेशजी उंदरावर स्वार होऊन आपले पुढे आलेले म्हणजे तुडुंब भरलेले पोट घेऊन घरी जात असताना चंद्र त्यांच्याकडे पाहून हसू लागला. व त्यांची चेष्टा करू लागला. चंद्राने केलेल्या या उपहासामुळे बालगणेश दुखावले गेले.
 
व त्यांनी चंद्राला आकाशातून लुप्त होण्याचा श्राप दिला. चंद्र श्रापामुळे क्षणात लुप्त झाला. पण यामुळे सृष्टीवर संकट निर्माण झाले. ज्यामुळे पोर्णिमामध्ये खंड पडू लागला. तसेच चंद्राला आपली चूक समजली. व देवदेवतांनी देखील बालगणेश यांना समजाविले. व चंद्राने चूक कबूल करीत बालगणेश यांची माफी मागितली. चंद्राच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन बालगणेश यांनी चंद्राला उशाप दिला. ज्यामुळे चंद्राचे गेलेले तेज पुन्हा परत आहे व चंद्र पूर्णपणे अदृश्य होण्याऐवजी काही दिवस तेजस्वी दिसू लागले. व ते पूर्णपणे लुप्त न होता काही दिवस त्यांचा आकार मोठा होऊ लागला तर काही दिवस त्यांचा आकार लहान होऊ लागला. 
 
तात्पर्य : दुसऱ्यांवर कधीही हसू नये. कारण आपण जसे कर्म करू तसे आपल्याला परत मिळते.