शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (13:33 IST)

दुष्ट माकड आणि चिमणीच्या घरट्याची कहाणी

Kids story a
एका घनदाट जंगलामध्ये एक भलेमोठे झाड होते. ज्याच्या फांदीवर चिमणीचे एक कुटुंब घर करून राहत होते. त्या चिमणीचे कुटुंब आनंदाने संसार करीत होते. मग काही दिवसानंतर पावसाळा लागला.  पाऊस पडू लागला. चिमणी आपल्या पिलांसोबत घरट्यात लपली. त्यावेळी अनेक माकडे पाउसापासून वाचण्यासाठी झाडावर आलीत, माकडांना पावसात भिजतांना पाहून चिमणीला त्यांची दया आली. 
 
चिमणी माकडांना म्हणाली की, “तुम्ही पावसापासून रक्षण व्हावे म्हणून घर का बनवत नाही." इवल्याश्या चिमणीचे बोलणे ऐकून माकडांना राग आला. माकडांनी रागाच्या भरात चिमणीचे घरटे झाडावरून खाली फेकले. ज्यामुळे उंचावरून खाली पडल्याने चिमणीच्या पिलांचा मृत्यू झाला. चिमणी वेळेत उडाली म्हणून चिमणीचा जीव वाचला. जमिनीवर मृत पावलेल्या पिलांना पाहून चिमणीला अश्रू अनावर झाले. बिचारी चिमणी रडत रडत ते झाड सोडून दुसऱ्या झाडावर निघून गेली.
 
तात्पर्य : मुळात वाईट प्रवृत्तीच्या लोकांना उपदेश देणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणे, केव्हाही वाईट लोकांपासून दूर राहावे.