रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (13:03 IST)

या सोप्या कुकिंग टिप्स अमलात आणून पदार्थांचा स्वाद वाढवा

आपण स्वयंपाक करण्यात किती ही तज्ज्ञ असाल तरी ही बऱ्याच वेळा अंदाज गडबडून जातो आणि पदार्थ फसतो. बऱ्याचदा स्वयंपाक करताना आपण लहानश्या चुका करतो, ज्यामुळे जेवण्याची चव खराब होते.  
 
पण काही युक्त्या वापरून आपण आपल्या अन्नाची चव सुधारू शकता. परंतु त्यानंतर कधी ही आपल्याकडून काही चुकले तर आपण त्या अन्नाला फेकू नये परंतु काही सोप्या युक्त्या करून त्या अन्नाला पुन्हा खाण्यास उपयुक्त करा. या व्यतिरिक्त आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपल्या स्वयंपाकघरातील कामे सोपे होणार.  
 
* पराठ्यांना चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेला बटाटा किसून घाला.
* पराठ्यांना तेलात किंवा तुपात शेकण्या ऐवजी लोण्यात शेकले तर अधिक चविष्ट बनतात.  
* ग्रेव्हीला दाट किंवा घट्ट करण्यासाठी त्यामध्ये सातू मिसळा. यामुळे ग्रेव्ही घट्ट होते आणि चविष्ट लागते.
* भजी करताना त्या घोळात चिमूटभर एरोरूट किंवा थोडं तेल गरम करून घालावं तर भजी कुरकुरीत आणि चवदार बनतील.
* भजी करताना त्यांवर चाट मसाला भुरभुरल्याने जास्त चविष्ट लागतात.
* भेंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी त्याचा वर थोडंसं मोहरीच्या तेलाचा वापर करावा.
* नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ आणि तेल घाला आणि काढल्यावर त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या. नूडल्स चिटकणार नाही.
* रायता बनवताना त्यात हिंग-जिरा भाजून टाकण्या ऐवजी हिंग-जिऱ्याची फोडणी द्यावी. रायता जास्त चविष्ट बनेल.
* राजमा किंवा उडीद वरण करताना पाण्यात उकळताना मीठ टाकू नये. लवकर शिजेल. मीठ डाळ शिजल्यावर घाला.
* पुऱ्या खमंग खुसखुशीत करण्यासाठी गव्हाचे पीठ लावताना त्यामध्ये एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला. पुऱ्या खुसखुशीत आणि खमंग बनतात.
* गव्हाच्या पिठात एक लहान चमचा साखर टाकून पीठ लावल्याने पुऱ्या फुगतात.
* पनीर जास्त घट्ट आणि कडक असल्यास चिमूटभर मिठाच्या कोमट पाण्यात 10 मिनिटासाठी ठेवावं पनीर मऊ पडेल.
* तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने तांदूळ मोकळे, पांढरे आणि चविष्ट बनतात.
* कांदा परतताना त्यामध्ये थोडी साखर घातल्यानं कांदा लगेच तपकिरी होतो.
* एक कप नारळाच्या पाण्यात दोन ब्रेड आणि एक चमचा साखर टाकून दळून घ्या. हे पीठ इडलीच्या घोळात टाकल्यानं खमीर चांगला येतो.
* दही करताना आंबट नसल्यास, कोमट दुधात एक हिरवी मिरची टाकून ठेवल्यानं देखील दही तयार होतं.