रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 जून 2023 (22:32 IST)

Useful kitchen tips काही उपयोगी किचन टिप्स

छोटे छोटे मोहरे बरेचदा मोठा काम करतात. स्वयंपाकघरात बहुपयोगी ठरणार्‍या स्मार्ट टिप्सचे ही असेच आहे. स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट व्हावा, जिन्नस टिकून राहावेत, त्यांचा पुरेपुर वापर व्हावा यासाठी या टिप्स नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 
आले : आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते. 
 
अंडे : अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहान से छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. 
 
ऑम्लेट : आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्व‍ादिष्ट बनते. 
 
आमरस : आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नयका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. 
 
आले, लसूण, मिरची पेस्ट : आले, लसून मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्रीत करा. पेस्ट स्वादिष्ट होते. 
 
बदाम : बदामाची साले सहज निघा‍वीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. 
 
बटाटा : बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.