शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (10:37 IST)

Wedding Anniversary Wishes for Partner In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, 
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, 
आनंदाने नांदो संसार आपला, 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत 
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर 
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण 
 
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे 
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे,
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तु माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
 
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे, 
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे. 
हॅपी अॅनिव्हर्सरी. 
 
जीवनातील आनंद फुलत जावो,
जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
 
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे 
आपल्या दोघांची साथ कायम राहो. 
आयुष्यातील संकटाशी लढताना 
आपली साथ कधीही न संपो 
हीच सदिच्छा आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
 
देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,
तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.