शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमगीत
Written By

80 पार आजोबा अन् 70 पार आजी...

80 पार आजोबा अन् 70 पार आजी ...
भल्या पहाटे आजोबा घ्यायला गेले भाजी..
 
आज जरा बाजाराचे वेगळेच होते रूप,
फूलवाल्या मावशी कडे गर्दी होती खूप!!
 
फुलांच्या टोपलीत नव्हती झेंडूची फुले!
गुलाबाची कळी घ्यायला उतावळी होती मुले!
 
आजोबांचे काही उलगडतं नव्हते कोडे.. 
एवढी गर्दी बघून वैतागले होते थोडे!
 
"हा काय प्रकार? " विचारलं घरी येऊन आजीला।
"अहो आज व्हॅलेंटाईन डे!" माहीत नाही तुम्हाला!!?
 
आजी चं हे उत्तर ऐकून आजोबा आधी गोंधळले, 
मनात काही विचार करून मिश्किलपणे हसले..
 
"बरं ,मग आज तू निवांत बसून माझ्या हातचा चहा घे।"
कोबी चं फूल देत म्हणाले, " डार्लिंग हॅपी व्हॅलेंटाईन्स डे!! " 
 
-ऋचा दीपक कर्पे