गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (18:59 IST)

Marathi joke : बाई आणि देव

joke
एकदा एका बाईवर देव प्रसन्न होतात.
देव - एक वरदान माग.
बाई  - मला तीन वरदान पाहिजेत.
देव - ठीक आहे, पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल...?
बाई  - कोणती...?
देव - मी तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन.
(देवाला वाटले ती स्री निरुत्तर होईल.)
बाई - चालेल.
देव - मग ठीक आहे, माग वरदान...
बाई  - मला सर्वात सुंदर बनव.
देव - तथास्तु...
(इकडे सासू दहापट सुंदर होते.)
बाई  - मला भरपूर संपत्ती द्या.
देव - तथास्तु...
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट संपत्ती जास्त मिळते.)
बाई  - मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या.
देव - तथास्तु...
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट हार्ट अटॅक येतो. सासू सरळ वर...)
आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते.

Edited by - Priya Dixit