स्वयंपाकघरात गॅस वापरताना..
* गॅस व सिलिंडर नेहमी उघडय़ा जागी ठेवावा. कपाटय़ासारख्या बंदिस्त जागी ठेवू नये.
* गॅस सिलिंडरच्या बाजूला वर्तमानपत्राची रद्दी, जुने कपडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत. * गॅस सिलिंडरच्या बाजूला रॉकेल, पेट्रोलसारखे ज्वालाग्राही पदार्थाचे डबे ठेवू नयेत.
* गॅस सिलिंडरच्या बाजूला ओलसरपणा, दमटपणा किंवा जास्त उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यवी.
* गॅस सिलिंडर जेव्हा वापरात नसेल तेंव्हा त्याची सेफ्टी कॅप त्यावर लावून ठेवावी.
* सिलिंडर ठेवण्यासाठी चाकाच्या ट्रॉलीज वापरू नयेत.* गॅसचा रेग्युलेटर व्यवस्थित बसला आहे की, नाही हे पाहण्यासाठी त्यावर साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का पाहावे.
* गॅसपुरवठा करणारी रबरी नळी आयएसओचा शिक्का असलेली घ्यावी. दर्जाहिन नळी घेऊ ने.
* गॅसपुरवठा करणार्या नळीची लांबी दीड मीटरपेक्षा जास्त नसावी.* गॅसपुरवठा करणार्या नळीला कोठे चिरा पडल्या नाहीत ना ते वरचेवर पहावे.
* गॅसपुरवठा करणार्या नळीवर उकळते पाणी किंवा गरम तेल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
* गॅसची शेगडी घेतानाही आयएसओचा शिक्का पाहूनच खरेदी करावी.* गॅसची शेगडी सिलिंडरपेक्षा उंचावर असावी.
* गॅसची शेगडी जमिनीपासून कमीत कमी दोन फुटावर आसावी.* गॅसच्या शेगडी खिडकीजवळ ठवू नये.
* गॅस शेगडी मागच्या ¨भतींवर कपाटे असून नयेत.* गॅसच्या शेगडीचा बर्नर पितळी असावा, लोखंडी बर्नर गंजल्याने आतील छिद्रे बुजतात.
* क्रोमियम प्लेटिंगपेक्षा स्टेनलेस्टिलची शेगडी जास्त काळ टिकते. अशाच शेगडीची निवड करा.
* स्वयंपाक करण्याची पूर्वतयारी व्यवस्थित करून मगच शेगडी पेटवावी. अगोदर शेगडी पेटवून ठेवू ने.
* गॅसवरील पदार्थाला उकळी आल्यावर गॅस बारीक करावा.* गॅस शेगडीवर अन्न शिजवताना लहान बर्नरवर लहान भांडे व मोठय़ा बर्नरवर मोठे भांडे ठेवावे.
* स्वयंपाकासाठी सपाट बुडाची भांडी वापरल्यास गॅसची बचत होते.
मृदुला फडके