गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (16:45 IST)

लिमिटेड होतं तेच बरं होतं ...

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा..... 
 
टी.व्ही. वर 1-2 channels होती व ती पण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची....
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा दीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा .... 
गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, ते पण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 
बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची......
 
 
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते......
पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.... आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !!

बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?
बेटा काळ खूप बदलला बघ...
तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.
तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.
तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.
तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.
तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात. तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं आता बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यावरील सेमिनर्स' अटेंड करावे लागतात.
 
-सोशल मीडिया