शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:08 IST)

गोड खावंसं वाटतंय, मग घरीच बनवा सफरचंदाची रबडी

रबडी ही एक उत्तर भारतीय चविष्ट अशी गोड पाककृती आहे. आपण ही चविष्ट रेसिपी सणासुदीलाच नव्हे तर आठवड्याच्या शेवटी देखील बनवू शकता. चटकन तयार होणारी ही रेसिपी आपल्या घरघुती समारंभात देखील आपण बनवू शकता. सफरचंद, दूध, साखर, वेलचीपूड, काजू आणि बदाम घरात असल्यास आपण हे पदार्थ कधीही बनवू शकता आणि ते देखील फार कमी वेळात. चला तर मग जाणून घेऊ या याची रेसिपी.
 
साहित्य - 
750 मिलीलीटर दूध, 1 सफरचंद किसलेले, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम बारीक कापलेले, साखर आवडीनुसार, वेलचीपूड चवीप्रमाणे.
 
कृती - 
सर्वप्रथम सफरचंद सोलून किसून घ्या. एका कढईत दूध घाला आणि त्याला उकळून घ्या. दूध अर्धा झाले की गॅस मंद करून द्या. आता या मध्ये किसलेले सफरचंद घाला. चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्या. या मध्ये साखर मिसळा आणि शिजवून घ्या. वेलची पूड, काजू, बदामाचे काप घालून ढवळून 1 मिनिटा साठी शिजवून घ्या. सफरचंदाची रबडी खाण्यासाठी तयार. आपली इच्छा असल्यास आपण हे थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता.