Coconut and Jaggery Ladoo Recipe : गूळ आणि खोबऱ्यापासून बनवा गोड रेसिपी
तुम्हाला देखील गोड खायला आवडते का? तर तुम्ही देखील घरीच गूळ आणि नारळाचे लाडू बनवू शकतात. तसेच हे लाडू नैवेद्याला देखील ठेऊ शकतात. सणउत्सव यांचा सीजन आला की काहीतरी गोडधोड बनवावे लागते मग पटकन काय बनवावे असे अनेक वेळेस सुचत नाही तसेच नैवेद्यात देखील वेगळे काय ठेवावे हा देखील अनेक वेळेस प्रश्न पडतो. म्हणून आज आपण पाहणार आहोत नारळ आणि गुळाचे लाडू जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर चला जाणून घ्या रेसिपी.
साहित्य-
2 वाट्या सुके खोबरे किस
अर्धी वाटी तूप
2 वाट्या गूळ
सुका मेवा
कृती-
नारळ आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी वाळलेल्या खोबऱ्याचा किस घ्यावा. तसेच तुम्ही बाजारातील देखील नारळाचा किस विकत घेऊ शकता.
आता एका पॅनमध्ये तूप घालावे व गरम होण्यासाठी ठेवावे. आता तुपामध्ये किस घालावा. खोबरेकीस भाजून घ्या. किस लाल झाल्यानंतर त्याला एका भांड्यात काढून घ्यावे.
आता पॅनमध्ये दोन वाट्या गूळ घालावा. गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये खोबरा किस घालावा.व छान परतवून घ्यावा. आता यामध्ये वेलची पूड घालून सुका मेवा घालावा.
जेव्हा मिश्रण कोमट होईल तेव्हा लाडू बनवून घ्या. व सेट होण्याकरिता 2 ते 3 तास ठेवावे. मग हवा बंद डब्ब्यामध्ये भरून ठेवावे. तर चला तयार आहे आपले नारळ आणि गुळाचे लाडू.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik