शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (22:46 IST)

अशी बनवा हेल्दी मखाना चिक्की, जाणून घ्या साहित्य आणि कृती

मखान्याचे आरोग्यदायी फायदे आहे. हे शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे, म्हणूनच हे आरोग्यदायी स्नॅक्सच्या श्रेणीमध्ये ठेवले जाते. संध्याकाळी थोडी भूक लागली तर मखाने परतून खाऊ शकता किंवा त्यापासून स्वादिष्ट चिक्की बनवू शकता. शेंगदाणाप्रमाणेच तुम्ही मखाना चिक्की बनवू शकता, जी आरोग्यदायी आणि चवदार आहे आणि सर्वांना आवडते. चला तर मग ते कसे बनवायचे ते जाणून घेऊ या.
 
साहित्य
2 कप - मखाने 
दीड वाटी - गूळ
1 टेस्पून - मगज
2 टीस्पून- तूप
 
कृती -
सर्वप्रथम कढईत मखाने कोरडे  भाजून बारीक वाटून घ्या. मगज कोरडी भाजून घ्या. आता कढईत दोन चमचे तूप घालून गूळ वितळवून घ्या. गूळ सतत ढवळत राहा, तो वितळला की गॅस बंद करा आणि त्यात मखाने पाऊडर आणि मगज घालून चांगले मिक्स करा. आता एका प्लेटमध्ये तूप लावून हे मिश्रण चमच्याच्या मदतीने गरमच पसरवा. हे लक्षात ठेवा की ते गरम पसरले पाहिजे नाहीतर ते घट्ट होईल आणि नंतर ते  पसरणार नाही. थोडे जाडसर ठेवा. थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने कापून सर्व्ह करा.
 
टीप-मखान्यात प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, खनिजे आणि अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, त्यामुळे ते सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. मखाने हे सहसा उपवासाच्या वेळी खाल्ले जाते, परंतु तुम्ही ते दररोज नाश्ता म्हणून घेऊ शकता.