गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: रविवार, 18 एप्रिल 2021 (12:21 IST)

मिठाने दूर करा नकारात्मक ऊर्जा

घरात सकारात्मक ऊर्जा असल्यास घराचं वातरवारण निरोगी राहतं. कामातील अडथळे आपोआप दूर होतात. घरात नकळत दोष असल्यामुळे हे वास्तूद्वारे दूर करता येतात. वास्तुप्रमाणे मिठाचा उपयोग करुन नकारात्मक उर्जा नष्ट करता येते. जाणून घ्या मिठाचे काही उपाय-
 
घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी काचेच्या एका बाउलमध्ये समुद्री मीठ आणि 5 लवंगा घ्या. हा बाउल घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे घरातील  पैशांची कमतरता दूर होते. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील सुख- समृद्धी येते. घरात सौहार्दाचे वातावरणात निर्माण होतं. 
 
तसंच मीठ व लवंगात पाणी मिसळून हे पाणी घरात शिंपडल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होतं.
 
बाथरूममुळे वास्तु दोष निर्माण होतं अशात काचेच्या बाउलमध्ये मीठ घेऊन बाथरुमच्या एका कोपऱ्यात ठेवा. त्या नंतर हात लावू नका. थोड्या थोड्या दिवसांनी बाउलमधील मीठ बदलत राहा. अशा प्रकारे बाथरूममधील सर्व प्रकारचे वास्तु दोष नष्ट होतात.
 
बाथरूममध्ये काचेच्या बाऊलमध्ये मीठ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगलं राहतं तसंच मानसिक तणावापासून सुटका होतो. यामुळे घरातून नकारात्मक उर्जा दूर होते.
 
मिठ्याच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा दूर होतं. नकरात्मक विचार दूर होतात. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर तरतरीत व ऊर्जावान जाणवतं. याने फ्रेशनेस वाढते आणि मेंदूतील वाईट विचार देखील दूर होतात.
 
घराच्या कोपर्‍यांमध्ये मिठाचं पाणी ठेवून देखील सकारात्मक ऊर्जा मिळवू शकता पण हे बदलताना घरात कुठेही न सांडता थेट फ्लश करावं.