मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Footwear Vastu घरात चपला घालून फिरावे की नाही, वास्तू काय सल्ला देतं जाणून घ्या

पूर्वीच्या काळी लोक घराबाहेरचे बूट आणि चप्पल काढून घरातच जात असत. घरात सर्वजण चप्पलशिवाय राहत होते. पण आजकाल बरेच लोक घरी चप्पल घालतात. काही लोक तर बाहेरचे बूट घालून घरात येतात. अशा वेळी वास्तूनुसार चप्पल घरात घालायची की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे.
 
घरात चप्पल घालावी की नाही
1. शनी देवाचा संबंध आमच्या पायांशी आहे.
2. पायात जोडे-चपला राहु - केतु यांचे प्रतीक आहे.
3. घरातच्या मुख्य दारासमोर जोडे-चपला ठेवू नये याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते
4. जी व्यक्ती घरात जोडे-चपला घालून येते त्यांच्यासोबत घरात राहु- केतु सारखे पापी ग्रह देखील घरात प्रवेश करतात.
5. अशात वास्तुनुसार घरात चपला घालणे चुकीचे मानले गेले आहे. आपण दुसरा पर्याय म्हणून घरात मोजे घालून फिरु शकतात.
6. घरात स्वयंपाकघर, भंडारघर, पूजाघर, तिजोरी ठेवलेल्या जागी इतर पवित्र जागी जोडे-चपला घालून फिरल्याने धन संपत्ती नाहीशी होते.
 
चला काही नियम जाणून घेऊया-
 
1. कधी जोड-चपला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे काढू नये.
2. जेव्हा आपण माती लागलेले जोडे उत्तर दिशेला काढता तेव्हा घरात सकरात्मक ऊर्जा देखील नकारात्मक ऊर्जा मध्ये बदलते.
3. घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास तेथे धनाची देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही.
4. अशात कधीही आपले घाणेरडे जोडे-चपला उत्तर दिशेकडे कधीही काढू नये जोडे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
5. फाटलेले आणि जुने जोडे घातल्याने शनीची अशुभ सावली पडते आणि घरात दारिद्रय येतं.
6. शनिवारी जोडे-चपला खरेदी करु नये असे म्हटले जाते कारण शनीचा संबंध पायांशी असतो. शनिवारी जोड-चपलांसोबत शनी संबंधी पीडा देखील घरात येऊ शकते.7. शनीची अशुभ सावली पडू नये यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे चामड्याचे जोडे किंवा चपला मंदिराबाहेर सोडून आल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते.