बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

Radha Ashtami 2024: विशेष नैवेद्य दही अरबी रेसिपी

Dahi Arbi
राधा अष्टमीची देखील जन्माष्टमी प्रमाणे खास मान्यता आहे. यादिवशी अनेक लोक उपवास करतात. असे म्हणतात की, राधा अष्टमीचा उपवास करणाऱ्यांवर श्रीकृष्णाची विशेष कृपा होते. अनेक लोक राधेला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवता.आज आपण देखील राधाराणीला आवडणारा पदार्थ पाहणार आहोत जो मथुरा मध्ये प्रसिद्ध आहे. तर चला राधा अष्टमी विशेष नैवेद्यात पाहू या दही अरबी रेसिपी. 
 
साहित्य-
350 ग्रॅम अरबी 
1/2 कप ताजे दही
1/2 चमचे आमसूल पूड 
1/4 चमचा सुंठ पूड 
1/2 चमचा काळी मिरी पूड 
1 चमचा ओवा 
1 चिमूटभर लवंग पावडर
1 चिमूटभर हिंग पावडर
1 वाटी देशी तूप
चवीनुसार सेंधव मीठ
कोथिंबिर 
आले
हिरवी मिरची
 
कृती-
सर्वात आधी अरबी स्वच्छ धुवून घ्या. धुतलेल्या अरबीला फ्रेंच फ्राइज शेप मध्ये कापून घ्या. यानंतर कढईमध्ये तूप गरम करावे. आता यामध्ये कापलेल्या अरबी टाकून डीप फ्राय कराव्या. हलका गोल्डन भरून कलर आल्यानंतर बाहेर काढून घ्या. आता आले, हिरवी मिरची आणि हिरवी धणे यांचा मसाला दहीअरबीसाठी तयार करावा. यासाठी सर्वप्रथम या तीन वस्तू बारीक चिरून पेस्ट बनवून घ्या.  
 
आता कढईत तूप गरम करावे. यानंतर हिंग आणि ओवा घालून थोडे तडतडू द्या. आता यानंतर आले-धणे पेस्ट घालून शिजवावे. तसेच नंतर दही फेटून त्यात मिक्स करावे. दही घालताच ते ढवळत राहावे लागेल. तसेच आता त्यात मीठ आणि उरलेले मसाले घाला. साधारण 3 मिनिटे शिजवा. यानंतर अरबी घालून मिक्स करा. मधून फिरवून भाजी चिकटत नाही ना ते तपासा. भाजीतून तूप निघू लागले की भाजी बनवून तयार आहे असे समजावे. तर चला तयार आहे आपली राधा अष्टमी विशेष दही अरबी. पुरी सोबत दही अरबी नैवेद्य दाखवून सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik