शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (22:25 IST)

चविष्ट बाकरवडी

साहित्य- 
2 कप मैदा,2-3 मोठा चमचा हरभराडाळीचे पीठ,चवीपुरते मीठ,1 चमचा तेल,1 लहान चमचा ओवा,
 
सारणासाठी साहित्य-
1 मोठा चमचा हरभराडाळीचे पीठ,1 लहान चमचा तीळ,1 लहान चमचा खसखस,1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट,लाल,2 चमचे तिखट,1 चमचा पिठी साखर,1 लहान चमचा गरम मसाला,1 चमचा धणेपूड,1 चमचा बडी शोप,1 चमचा किसलेले सुके खोबरे,3 -4 चमचे बारीक शेव,मीठ.
 
कृती 
मैदा नई हरभराडाळीचे पीठ एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घाला.तेल गरम करून त्या पिठात घाला.पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या.त्याला झाकून 15 -20 मिनिटे बाजूस ठेवा.
सारणासाठी -
सर्वप्रथम तीळ आणि खसखस तव्यावर भाजून घ्या,सारणासाठी लागणारे सर्व जिन्नस एकत्र करून तेलावर परतून घ्या.सारण तयार झाले.आता  मैद्याची एक मोठी पोळी लाटून घ्या. त्या पोळीत हे सारण 1-2 चमचे घेऊन पसरवून  द्या. आता त्या पोळीचा गुंडाळा करून रोल बनवा.सुरीने 1 -1  इंचचे काप कापा. सर्व काप कापले गेल्यावर हे केलेले काप कढईत तेल तापत ठेवा आणि तेल गरम झाल्यावर त्या तेलात सोडा आणि तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. खमंग खुसखुशीत बाकरवडी खाण्यासाठी तयार.बाकरवडी थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.