सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (18:27 IST)

32 वर्षीय व्यक्ती कडून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार मुंबईतील घटना

rape
अलीकडे महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होण्याचे प्रकरण वाढत आहे. मुबंईत एका केटरिंग फर्म मध्ये काम करणाऱ्या 32 वर्षाच्या तरुणाने एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 
या इसमाने मुलीला निर्जन स्थळी पळवून नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला नंतर मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून काही लोक घटनास्थळी धावत गेले तेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र जमावाने त्याला पकडून त्याला मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला आमिष दाखवून निर्जन स्थळी नेले आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला मुलगी रडायला लागल्यावर त्याला लोकांनी जाऊन पकडले नंतर त्याला चांगलेच मारले मुलीला तातडीनं रुग्णालयात नेले आता तिच्यावर उपचार सुरु आहे. 
पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ज्यात मुलांचे बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याचा समावेश आहे. 
Edited By - Priya Dixit