रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (21:38 IST)

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

death
मुंबईतील लालबाग़ परिसरात एका भरधाव ट्रक ने दुचाकीस्वाराला मागून धड़क दिल्याने या अपघातात एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तिप्पण्णा शंकर आप्पा असे मृताचे नाव असून तो धारावी चा रहिवासी होता. चिंचपोकळीतून लालबाग़ कड़े जात असताना हा अपघात घडला. 

ट्रक ने दुचाकीला मागून दिलेली धड़क एवढी जोरदार होती की तरुण दुचाकीवरून खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला त्याला तातडीन रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  

या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अपघातामुळे वाहतूक कही काळ खंडित झाली होती. नंतर परिस्थिति नियंत्रणात आली.

तिप्पण्णा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.
Edited By - Priya Dixit