गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:29 IST)

मुंबईत मालाडमध्ये तीन मजली इमारत कोसळली

  building
मुंबई : एका मोठ्या बातमीनुसार, मुंबईतील मालाडमधील मालवणी  भागात तीन मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ढिगाऱ्याखाली 2-3 जण अडकल्याची  भीती व्यक्त होत आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघाताच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ..
 
 विशेष म्हणजे, मुंबईत अनेक इमारती जुन्या, मोडकळीस आलेल्या  आहेत. मात्र असे असूनही त्या इमारतींमध्ये लोक राहतात. गेल्या वर्षी शहरातील अंधेरी परिसरात मध्यरात्री चार मजली इमारत कोसळली होती. ज्यात अग्निशमन दलाच्या जवानासह सहा जण  जखमी झाले.