बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (10:53 IST)

नवजात बाळाला रस्त्यावर सोडल्याप्रकरणी महिलेला अटक

baby legs
बहिणीच्या नवजात अर्भकाला रस्त्यावर टाकून दिल्याप्रकरणी ठाणे शहरातील पोलिसांनी एका 24वर्षीय महिलेला अटक केली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार कळव्यातील भास्कर नगरमध्ये मंगळवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास काही वाटसरूंनी एका चाळीजवळ एक नवजात मुलगी रस्त्यावर पडलेली पाहिली आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. तसेच नवजात मुलीच्या पालकांचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.  
 
अधिकारींनी सांगितले की, तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस सहा तासांत मुलीच्या मावशीपर्यंत पोहोचले. महिलेची चौकशी केल्यानंतर हे मूल तिच्या बहिणीचे असल्याचे समोर आले. व याप्रकरणात मुलीच्या मावशीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

Edited By- Dhanashri Naik