1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 8 जुलै 2020 (09:06 IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी हल्ला: आरोपींना तात्काळ अटक व्हावी, फडणवीसांची मागणी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेवर निषेध नोंदवला जात आहे. 
 
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे.”.
 
“मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे,” असे ट्विटद्वारे फडणवीस यांनी सांगितले.