बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (16:15 IST)

वॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार

मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी वॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार अशी आश्वासन महापौरांनी दिले. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, रुग्णालय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बॉम्बे हॉस्पीटलला सध्या २०० बेड आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत १५० बेड रुग्णालयाला दिले जाणार आहेत. १० बेड राखीव ठेवले जाणार आहे. तेही अशा रुग्णांना ज्यांना या रुग्णालयावर विश्वास असतो म्हणून उपचारासाठी भर्ती व्हायचे असते. मात्र १० वर एकही बेड आधीच राखीव ठेवले जाणार नाहीत. दरम्यान महौपांनी आज रुग्णालयांमधील रेमिडेसिवीर इंजेक्शन साठ्याची देखील पाहणी केली.
 
यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, ”सरकार कोरोना रुग्णांच्या बाबतीत कोणतही हलगर्जीपणा करत नाही परंतु नागरिकांना साथ देणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता महापालिकेशी संपर्क करा. खाजगी रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित करु नका, तसेच रुग्णांनी देखील पैसे आहेत म्हणून रुग्णालयात येऊन पडू नका. पालिका अशा पद्धतीने बेड आरक्षित केलेल्या रुग्णालयांवर कारवाई करत आहे. पालिका वॉर्डमधून येणाऱ्या रुग्णांना प्राधान्य दिले जाणार असून, थेट रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर अडकाव केला जाणार आगे. येणारा आठवडा सुटट्यांचा आठवडा असल्याने मुख्य़मंत्री योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे संध्याकाळ पर्यत वाट बघू या. असे लॉकडाऊन वाढवण्याचे सुचक संकेत महापौरांनी दिले.