शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (08:02 IST)

मध्य रेल्वे विस्कळीत; मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद झाली

local
ठाणे रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून कल्याणकडे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची वाहतूक ठप्प झाली. यामुळे कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रवाशांना सायंकाळी ६.३७ ते ७.३३ या एक तासांच्या कालावधीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर अडकून पडावे लागले. यामुळे अप व डाऊन मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये तासन् तास अडकून पडल्याने प्रवासी उकाड्याने अक्षरश: हैराण झाले.
 
ठाणे व कळवादरम्यान सिग्नल यंत्रणेत ६.३७ वाजता बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. ठाण्याकडे येणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकातच थांबविण्यात आल्यामुळे रेल्वेच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

Edited by : Ratnadeep Ranshoor