गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (23:08 IST)

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा चार जणांना अटक

मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात  पुन्हा चार जणांना अटक केली आहे. या आरोपींची नावे अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दायरा, अवीन साहू असे असून त्यांना एस्प्लेनेड कोर्टने ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. 
 
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज पेडलर्स आणि एक प्रवाशासहित चार लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला रविवार अटक करण्यात आली होती. रविवारी क्रूझ मुंबईत परल्यानंतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणात आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
याप्रकरणातील आरोपी आर्यन खानसह आठ जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर  एकूण आठ जणांचा अटक करण्यात आली आहे. यापैकी चार जणांचा कोर्टात हजर करून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत रवानगी केली असून उर्वरित चार जणांना कोर्टात हजर केले जाणार आहे.