सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (09:14 IST)

वरवरा राव यांना कोरोना

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व कवी वरवरा राव यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावत चालली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आवश्यक सुविधा देण्याची मागणी केलेली होती. दरम्यान, वरवरा राव यांची करोना चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
 
पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी तेलगू कवी व सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव सध्या अटकेत आहेत. वरवरा राव यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावत चालली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी आवश्यक वैद्यकीय सुविधांची मागणी केली होती. अखेर वरवरा राव यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.