रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (08:40 IST)

मुंबईत नव्या कोरोनाचे ५ रुग्ण आढळले

देशात नव्या कोरोना स्ट्रेनग्रस्तांची संख्या वाढून 58 रूग्ण झाली आहेत. पुणे एनआयव्हीत 20 नव्या केसेसचा उलगडा झाला आहे. नव्या कोरोनाचा देशात फैलाव वाढत आहे. मुंबईतही नव्या कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत नव्या कोरोनाचे  ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 
 
ब्रिटनमधून आलेल्या पाच जणांना नवा कोरोना झाला होता. हा नवा कोरोना सुपरस्प्रेडर असल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या रिपोर्टकडे लक्ष होते. पण या ४० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला मिळाला आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे नवा कोरोना झालेल्या पाच जणांपैकीही दोन जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेत.
 
दरम्यान, ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग भारतात सतत वाढत आहेत आणि एनआयव्ही पुणे लॅबमध्ये 20 नवीन घटना समोर आल्या आहेत. यानंतर, भारतातील नवीन कोरोना स्ट्रेनची संख्या 58 वर पोहोचली आहे.