सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (11:21 IST)

मुंबईत अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान मुंबईतील भायखळा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 
 
17 वर्षीय विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे कोचिंग क्लासमध्ये शिकवणीसाठी जात होती. दरम्यान शुक्रवारी शिकवणीसाठी ही आली असताना येथील शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. किशोर जाधव वय 29 असे आरोपी शिक्षकाचे नाव आाहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केला जात आहे.