गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (08:14 IST)

मनसुख हिरेन यांनी मानसिक छळ होत असल्याची केली होती तक्रार

मनसुख हिरेन यांनी मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे  केली होती. या तक्रारी मध्ये मनसुख हिरेन यांनी घडलेला सगळा घटनाक्रम मांडला आहे. मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात विक्रोळी पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे,एनआयए, घाटकोपर पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका पत्रकाराच्या नावाचा समावेश आहे. 
 
मनसुख हिरेन यांनी त्यांच्या 17 फेब्रुवारीला सांयकाळी 6 वाजता ठाणेवरुन मुंबईला येताना स्कॉर्पिओ नंबर MH02 AY 2815 या गाडीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं ती ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नाहुर उड्डाणपुलाजवळ ती पार्क केली असं म्हटलंय. 18 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी मेकॅनिकसह पोहोचलो असता स्कॉर्पिओ तिथं आढळून आली नाही. त्यामुळे विक्रोळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.